Pune schools Holiday | पुणे जिल्ह्यातील शाळांना 19 पर्यंत सुट्टी, शिक्षणाधिकारी यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी (Pune schools Holiday) जाहीर केली होती. त्यानंतर 11 आणि 12 तारखेला शाळा सुरु करण्यात आल्या. परंतु आता दिवाळीत कमी झालेल्या 5 सुट्या समायोजित करण्यासाठी शनिवार (दि.13) पासून गुरुवार (दि.19) पर्यंत शाळांना सुट्टी (Pune schools Holiday) जाहीर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे (Sunanda Wakhare) यांनी दिली.

 

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना 19 नोव्हेंबर पर्यंत सुटी जाहीर करण्यात (Pune schools Holiday) आली आहे. 19 तारखेला गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti) असल्याने राष्ट्रीय सुटी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा येत्या 20 नोव्हेंबरपासून नियमितपणे सुरु होतील, असे सुनंदा वाखारे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळा, स्वयं अर्थसहाय्य शाळांच्या मुख्याध्यापकांनी वरील निर्णयाचे पालन करावे, असे निर्देश प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आले आहेत.

 

कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या अनुषंगाने राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान शासनाच्या परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तसेच 11 नोव्हेंबर पासून शाळा नियमित सुरु करण्याचे आदेश दिले होते. 11 आणि 12 नोव्हेंबर हे दोन दिवस शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.

 

Web Title : Pune schools Holiday | holidays schools district till november 19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kangana Ranaut | कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो Viral

Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीच्या दुबईवरून आलेल्या महिला साथीदार ‘कुसुम’ला अटक

SBI Credit Card | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार मोठा फटका ! 1 डिसेंबरपासून ट्रांजक्शन होणार महाग; जाणून घ्या किती वाढणार शुल्क