Coronavirus : ‘कोरोना’च्या ‘स्ट्रेन्स’ला वेगळं करणारा भारत ठरला 5 वा देश, औषध बनविण्यासाठी होईल मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील सर्व देश औषधे तयार करण्यात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत भारताला मोठे यश मिळाले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या स्ट्रेन्स ला वेगळे केले आहे. ज्यामुळे कोरोना विषाणूवर औषधे आणि लस तयार करण्यात मदत होईल.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मते, अनेक शास्त्रज्ञ बर्‍याच काळापासून कोरोना विषाणूवर काम करत होते. ते म्हणाले की, पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या स्ट्रेन्स ला वेगळे करण्यात यश मिळवले आहे.

असे म्हटले जात आहे की वैज्ञानिकांचा हा शोध कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कोरोना विषाणूच्या स्ट्रेन्स ला वेगळे केल्याने विषाणूची तपासणी करण्यासाठी किट बनवण्यास मदत मिळणार आहे. एवढेच नव्हे तर किट बनविण्यात, औषधे शोधण्यात आणि लसांच्या संशोधनातही बरीच मदत होईल.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूसंदर्भात आतापर्यंत एकूण चार देशांना हे यश मिळाले आहे. ज्यामध्ये अमेरिका, जपान, थायलंड आणि चीन या देशांचा समावेश आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, आयसीएमआर पुणे येथील वैज्ञानिक प्रिया अब्राहम यांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूबाबत भारताने नुकताच पहिला टप्पा पार केला आहे. त्यांनी सांगितले की, आग्राच्या ६ रुग्णांकडून आणि इटलीतील काही नागरिकांकडून मिळालेल्या विषाणूला वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे विषाणूचा स्ट्रेन वेगळा करण्यात आला होता. त्यानंतर, त्या स्ट्रेन ला वुहान कोरोना विषाणूच्या स्ट्रेन मध्ये विलीन करण्यात आले.

शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की या दोन विषाणूंमधील स्ट्रेनमध्ये ९९.९८% समानता आहे. वैज्ञानिक प्रिया अब्राहम म्हणतात की कोणताही रोग दूर करण्यासाठी किंवा त्यास प्रतिबंध करण्यासाठी त्यास ओळखणे आवश्यक आहे. एक प्रकारे याला पहिला टप्पा म्हणतात. यानंतर, लस आणि उपचार इत्यादींसाठी काम केले जाते. एका वृत्तपत्रानुसार, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी वैज्ञानिकांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की हे एक मोठे यश आहे. अशाप्रकारे विषाणूचा स्ट्रेन वेगळा करणारा भारत जगातील पाचवा देश बनला आहे.

या यशामुळे वैज्ञानिक कोरोना विषाणूची लस शोधण्याच्या दिशेने वेगवान पद्धतीनं काम करू शकतील. कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी आतापर्यंत ६५ प्रयोगशाळा देशभर कार्यरत आहेत.