Pune : सेवानी खून प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली असून, तबल 4 हजार 629 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 2 हजार 298 जणांवर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 8 हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना दुहेरी कसरत करावी लागत असल्याचे यावरून दिसत आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर, राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. पुण्यात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुण्यात नागरिकांना वाहने रस्त्यावर घेऊन येण्यास बंदी केली आहे. अत्यावश्यक असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेकजण विनाकारण दुचाकी घेऊन फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी (दि.२ एप्रिल) पर्यंत ही कारवाई केली आहे. पोलीस थेट वाहने जप्त करत असल्याने आता नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याचे पहिला मिळत आहे. परंतु, शहरातील उपनगर आणि गल्ली बोळात फिरणाऱ्या टवाळ खोरांचे प्रमाण आणखीही सुरूच आहे.

पोलिसांनी संचारबंदी जाहीर झाल्यानंतर 2 हजार 298 जणांवर 188 नुसार कारवाई केली आहे. तर, 7 हजार 910 जणांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यासोबतच 4 हजार 629 वाहने देखील जप्त केली आहेत. यात चारचाकी आणि दुचाकींचा समावेश आहे दुचाकी सर्वाधिक आहेत. नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे, आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरात सुमारे १२० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.

दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद केली आहे. तरीही या आदेशाने उल्लंघन करून पेट्रोल विक्री करणाऱ्या १९ पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूढे देखील ही कारवाई अशीच कारवाई केली जाणार आहे.