भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव कारने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाचा जागिच मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली. चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रभाकर सिताराम गुंफेकर (वय 78, रा. सिंहगड रोड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी कार चालक बाळासाहेब हनुमंत प्रताप (वय 50, रा. सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रभाकर यांचा मुलगा राजेश गुंफेकर (वय 51) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकार हे सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील रोहन कृतिका बिल्डींगसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी स्वारगेटकडून सिंहगड रोडकडे जाणार्‍या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. यात गंभीर मार लागल्याने प्रभाकर यांचा जागिच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –