Pune : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत मगर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत बाळासाहेब मगर यांचे आज (सोमवार, दि. 12 एप्रिल) निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुले, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे.

हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रमौलेश्वर मंदिराचे प्रमुख विश्वस्त, भैरवनाथ मंडळाचे चिटणीस, ज्ञानदा ग्रंथालयाचे कार्यवाहक, पुणे शहर काँग्रेस शहरचे सरचिटणीस, हडपसर देवस्थानचे खजिनदार, हडपसरमधील राममंदिराच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा विविध संघटना संस्थांची जबाबदारी सांभाळली आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे कट्टर समर्थक होते.