Pune Serum Institute News | ‘सीरम’ची मोठी घोषणा ! तिसरी लस देखील पुण्यातच तयार होणार; सप्टेंबरपासून स्पुटनिक- V लसीचे उत्पादन

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Serum Institute News। ‘कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हीशील्ड’ (covishield) म्हणून प्रसिद्ध असणारी आणि सर्वात जास्त लसीचा पुरवठा करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पुण्यामध्ये तिसरी लस (Vaccine) तयार होणार आहे. ऑक्सफोर्ड, नोवोवॅक्सच्या कोरोना प्रतिबंधक लशीनंतर आता रशियाची कोरोना लसही पुण्यामध्ये तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रशियाची (Russia) कोरोना प्रतिबंधक लस ‘Sputnik-V’ चे उत्पादन घेण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. Pune Serum Institute News | pune serum institute of india manufacture russian corona vaccine sputnik v from september

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) यांच्यात करार करण्यात आला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट आता सप्टेंबर महिन्यापासून रशियन ‘Sputnik-V’ कोरोना प्रतिबंधक लशीचं उत्पादन सुरू करणार आहे.
म्हणून तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, देशात प्रतिवर्षी या कोरोना प्रतिबंधक लशीच्या (Vaccine) 300 दशलक्षपेक्षा जास्त लशींच्या डोसची निर्मिती करण्याचं टार्गेट आहे.
तसेच, या लशीची पहिली बॅच सप्टेंबर महिन्यात (2021) मिळण्याची अपेक्षा आहे.

या दरम्यान, स्पुतनिक V (‘Sputnik-V’) ही लस (Vaccine) कोरोना विषाणू विरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद केली गेली आहे. तर रशियाने पहिल्यांदा या लशीला मान्यता दिली आहे.
नंतर सप्टेंबर पासून ही कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली आहे.
नियमाप्रमाणे या लशीचे 2 डोस घ्यावे लागतात.
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 21 दिवसांनी घेणे आवश्यक आहे.
स्पुतनिक V लसीचे डोस घेतल्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात करते.
या दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम कोविशिल्ड (covishield) ) नंतर कोवोवॅक्स (Covovax) आता रशियन स्पुतनिक V ही पुण्यात तयार होणारी आता तिसरी कोरोना लस असणार आहे.

Web Title : Pune Serum Institute News | pune serum institute of india manufacture russian corona vaccine sputnik v from september

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Half Moon on Nails | नखांमध्ये दिसणारे ‘हे’ अर्धे चंद्र बर्‍याच आजारांचे देतात संकेत, जाणून घ्या

Atal Pension Yojana | केवळ 7 रुपये प्रतिदिवस गुंतवणुकीने दर महिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, फक्त करा ‘हे’ काम