कॅम्पमधील पंचताराकिंत हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कॅम्पमधील सागर प्लाझा हॉटेल वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये चालणारा वेश्या व्यवसाय सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला असून एका एजंटला अटक करण्यात आली आहे. गणेश भीम बिस्टा (वय ३६, रा. सोमनाथ नगर, वडगाव शेरी) असे या एजंटचे नाव आहे. मध्य प्रदेशमधील एका २४ वर्षाच्या तरुणीकडून तो वेश्या व्यवसाय करुन घेत होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88ec53ff-bc8d-11e8-8d0c-691803f98f21′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी मुळची मध्य प्रदेशातील नरोजाबार येथील राहणारी आहे. पूर्वी ती दिल्लीमध्ये गो एअर या विमान कंपनीच्या ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करीत होती. तेथील नोकरी सुटली. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने इतर काम शोधत असताना तिची गणेश बिस्टा याच्याशी ओळख झाली. त्याने पैशाचे आमिष दाखवून तिला पुण्यात आणले व कॅम्पमधील सागर प्लाझा या पंचतारांकित हॉटेलमधील रुम आॅनलाईन बुक केली होती. गणेश बिस्टा हा हॉटेलच्या दारात गिऱ्हाईकाकडून पैसे घेत असे. त्यानंतर त्याला रुममध्ये पाठवत असे.

धक्कादायक.. २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचार

याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठविले. खातरजमा केल्यानंतर या तरुणीला ताब्यात घेतले. गणेश बिस्टा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक तुषार आल्हाट यांनी फिर्याद दिली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खेडकर अधिक तपास करीत आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने केली.

You might also like