Pune : Lockdown काळात सेक्सटॉर्शनच्या तक्रारीत वाढ; तब्बल 150 जणांना ‘तसलं’ चॅट करणं आलं अंगलट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वच व्यवहारांवर आणि कामावर निर्बध आले. प्रत्यक्ष काम न करता ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वत्र काम करण्यास सुरुवात झाली. यामुळे इंटरनेटच्या वापरात अधिक वाढ झाली. यातच पुण्यामध्ये लॉकडाऊन Lockdown काळात सेक्सटॉर्शनच्या तक्रारीत अधिक वाढ झाल्याचे दिसून आहे. पुण्यातील Pune ऑनलाईन सेक्स चॅट करणे जवळपास १५० लोकांना भोवले आहे. १५० तक्रारी पोलिसांमध्ये दाखल आहेत.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 14,123 नवीन रुग्ण, तर 35,949 जणांना डिस्चार्ज

लॉकडाऊन Lockdown काळात इंटरनेटच्या अवाढव्य वापरामुळे सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात अनेक सायबर तक्रारी अधिक प्रमाणात येत आहेत. मुख्यतः म्हणजे या तक्रारीमध्ये सेक्सटॉर्शनचे ‘प्रमाण (तक्रार) अधिक आहे. तक्रारी न करणारे देखील अनेक लोकांची संख्या देखील अधिक असल्याचे वर्तवले आहे. पुणे Pune सायबर क्राईम मागील ३ महिन्यापासून सेक्सटॉर्शनच्या १५० केसेस हाताळत आहेत. कोरोनाच्या महामारीत पुणे सायबर क्राईमकडे ११० सेक्सटॉर्शनच्या तक्रारी आल्या आहेत. या केवळ एप्रिल महिन्यातील तक्रारी आहेत.

Facebook, Instagram आणि Telegram या साईटवर अनेक टोळी लोकांना फसवत आहे. मुलीच्या नावाने अकाउंट काढून पुढच्या व्यक्तीला जाळ्यात ओढतात. पहिल्यांदा अशा पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर त्या हळूहळू त्यांना व्हिडिओ कॉल करतात. त्यानंतर त्या ऑनलाईन सेक्ससाठी विचारणा करतात. असे कृत्य सध्या दिसून येत आहे. समजा, पुरुष त्यांच्या जाळ्यात अडकला की, लैंगिक कृत्ये करण्यास सुरु करतात त्यावेळी ते व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात. तेथूनच सेक्सटॉर्शन सुरु होते. आपली बदनामी होऊ नये यासाठी या व्यक्ती खंडणी देतात.

दरम्यान, पुण्यामधील एका २८ वर्षाचा मुलगा असलेल्या महिलेला त्याच्या मुलाचा अश्लिल व्हिडिओ तिच्या समाज माध्यम अकाऊंटवर आला. अर्थात हा व्हिडिओ काही क्षणापूर्वीच रेकॉर्ड झाला होता. या महिलेचा मुलगा एका पूजा नावाच्या तरुणीबरोबर व्हिडिओ चॅट करत होता. त्याचा हा अश्लिल व्हिडिओ त्याच्या जवळच्या संपर्क यादीत शेअर केल्यानंतर त्याला समजले की आपण सेक्सटॉर्शनला बळी पडलो आहे. हा व्हिडिओ २८ वर्षाच्या मुलाच्या आईला पाठवल्यानंतर, एका अनोळखी पुरुषाचा फोन त्या मुलाला आला. त्याच्याकडे हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी २५ हजार रुपयांचा मागणी करण्यात आली. जर पैसे दिले नाही तर समाज माध्यमावर हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती