Pune : लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवून लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास लोणीकंद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभम चापुडकर (वय २५, निगडी गावठाण, मूळ कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी वाघोली भागात राहणाऱ्या २७ वर्षिय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. शुभम आणि फिर्यादी महिला हे दोघे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. फिर्यादी या विवाहित असून वाघोली परिसरात रहावयास आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये दोघांची ओळख झाल्यानंतर शुभम याने महिलेशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर शुभम याने महिलेस कोल्हापूर आणि वाघोली येथे लॉजवर नेऊन तीच्यासोबत बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले. शुभम याने विवाहित महिलेस तीच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगळवारी आरोपीस अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभिर स्वरूपाचा असून पुढील तपासासाठी आरोपीस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.