Pune : मानवतेच्या भावनेतून कष्टकऱ्यांना एक घास मायेचा स्तुत्य उपक्रम – शैलेंद्र बेल्हेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे रोजंदारीवर करणाऱ्यांच्या हाताला काम नाही, दाम नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी, ती अनेकांपर्यंत पोहोचली नाही, अशी अवस्था आहे. मानवता हात धर्म मानून अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या मायेचा घास देण्यासाठी हात पुढे केला आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत अरुणदादा बेल्हेकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी व्यक्त केले.

मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था संलग्न नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने ”आपले जेवण आपल्या बांधवांसाठी” हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये मांजरी हडपसर परिसरातील वस्त्या व सोसायट्यांमधील नागरिकांच्या घरात बनवलेल्या ताज्या चपाती व भाजी असे साहित्य जमा करून त्या डब्यात भरून, त्यासोबत एक पाण्याची बाटली गरजूंना दिली जात आहे. या उपक्रमाला मागिल पंधरा दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील अनेक नागरिकांनी वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम संस्थेच्या या उपक्रमाला अन्नदान करीत आहेत.

संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, अतुल रासकर, मीनाक्षी कुमकर, डॉ. शोभा पाटील, प्रदीप मगर, कैलास कुंजीर, रमेश उंद्रे, महेश गळगे, राहुल कुदळे, विकास हिरुळकर, आदित्य घाडिगावकर, अमोल शिंगडगाव, अर्चना दूंगरवाल, शंकर बावकर, गोरख आड़ेकर, मसा जाधव, मधुकर कवडे यांचा या उपक्रमामध्ये मोठा सहभाग आहे. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी मार्गदर्शन केले.