Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | झपाट्याने विस्तारत असलेल्या पुण्याला मुलभूत सुविधा पुरविण्याचे आव्हानात्मक काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) जोमाने करीत आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे (Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole) यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2023) सत्ताधारी पक्षाच्यावतीने मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलताना सांगितले.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर (Education Hub) आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्याच बरोबर पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (IT Hub) यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून मूळ सुविधा पुरविणे हे एक आव्हानात्मक काम सरकारपुढे उभे राहिले आहे, असे सांगून आमदार शिरोळे म्हणाले, या सर्वांची गरज ओळखून २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात पुणे शहरामध्ये अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो (Pune Metro), स्मार्ट सिटी (Pune Smart City), नदी सुधार, रिंग रोड (Pune Ring Road) , २४/७ पाणीपुरवठा योजना (Pune 24 x 7 Water Supply Project), इत्यादीचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व कामे प्रगती पथावर आहेत.

पुणे मेट्रोचे उदघाटन होऊन वनाज ते गरवारे कॉलेज पर्यंतचा मार्ग (Vanaz to Garware Metro Route ) सुरु देखील झाला आहे. मेट्रोचे काम जोमाने सुरु असताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा (Pune Traffic Jam) त्रास सहन करावा लागत आहे. हिंजेवाडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गावर (Hinjewadi To Shivajinagar Metro Route) पुणे विद्यापीठ चौकामधील उड्डाणपुलाचे (Pune University Flyover) काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका वर्षांमध्ये पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आ.शिरोळे (Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole) यांनी यावेळी बोलताना केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखाली २०१८ मध्ये PMPML च्या ताफ्यात
इलेक्ट्रिक एसी बस खरेदी करण्याचा निर्णय झाला व आजमितीला या बस गाड्या पुणे शहरामध्ये धावत आहेत, याचा अभिमान मला एक पुणेकर म्हणून आहे. पीएमपीएमएल अजून जास्त सक्षम करण्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधीची आवश्यकता असून तो उपलब्ध करावा, असेही आ.शिरोळे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ मध्ये विधानसभेत मी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad)
नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधीची लक्षवेधी मांडली होती.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला होता,
या धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील जलपर्णी हटवणे शक्य आहे का? असा प्रश्न माझ्याकडून विचारण्यात आला. त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जलपर्णी काढण्याचे आदेश दिले होते. परंतु परिस्तिथी जैसे थे आहे. ही जलपर्णी लवकरात लवकर काढून तेथील स्थानिक नागरिकांची जलपर्णीच्या त्रासातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी आ.शिरोळे यांनी केली.

पुणे शहरामधील पुणे मनपा कॉलनीची (Pune PMC Colony) आणि पोलीस वसाहतीची (Pune Police Line)
अत्यंत दुरवस्था झालेली आहे, तरी या नव्याने बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा,
अशी मागणी आ.शिरोळे यांनी केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पीएमआरडीएचा विकास आराखडा
(PMRDA Development Plan) करण्यासाठी सिंगापूरच्या सरकारला काम दिले होते.
सिंगापूर सरकारने अतिशय सुंदर असा पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यानुसार लवकरात लवकर काम सुरू झाले तर पुण्याच्या विकासाला गती मिळेल.
तोपर्यंत पुणे मनपाला स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नेमावे जेणेकरून नवीन ३४ गावांचा विकास जलदगतीने
सुरू होईल, असे आ.शिरोळे म्हणाले.

Web Title :- Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | Maharashtra state government accepted the challenge of Pune’s development; Big projects should be speeded up – MLA Siddharth Shirole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन