पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | काही संस्थांनी चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी झटकल्याने बोपोडी, चिखलवाडी आणि औंध मधील विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे (Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडे आज (बुधवारी) केली आहे.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चिखलवाडी येथे महापालिकेची माता रमाबाई आंबेडकर शाळा आहे. या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी पुणे महापालिकेने एका संस्थेकडे दिली होती. परंतु, महापालिकेसोबत काम करण्यासाठी इच्छुक नसल्याचे संबंधित संस्थेने कळविल्याने इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग अचानक बंद करण्यात आले आहेत.
त्यामुळे बोपोडी, चिखलवाडी आणि औंध येथील प्राथमिक शाळांमधून माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे समजताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत (Minakshi Raut PMC) यांची भेट घेतली आणि कोणताही विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय प्रवेशापासून वंचित राहू नयेत,
यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या.
तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशीही आमदार शिरोळे यांनी बोलणे केले.
कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी आमदार शिरोळे यांना दिले.
या भेटीच्या वेळेस आमदार शिरोळे यांचे समवेत माजी उपमहापौर सुनिता वाडेकर (Sunita Wadekar),
आनंद छाजेड (Anand Chhajed) आदी उपस्थित होते.
Web Title : Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | Students of Aundh, Bopodi should not be deprived of schooling; MLA Shirole’s demand to Municipal Commissioner
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Yerwada Jail News | येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न
- Pune Crime News | पुण्यातील इराणी टोळीतील 21 जणांवर मोक्का कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार
यांच्याकडून आतापर्यंत 25 गँगवर MCOCA - Ambil Odha Babbling Brook to Nasty Drain | ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ पुस्तकाचे
शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन (Video)