Pune Shivaji Nagar Police | ‘तो’ दरोडा नाही, पेट्रोल भरण्यावरुन मारहाण; शिवाजीनगर पोलिसांकडून आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Shivaji Nagar Police | शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनपा जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery Petrol Pump) पडल्याची बातमी समाजमाध्यमातून व्हायरल झाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार दरोडा नसुन पेट्रोल भरण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपाच्या मालकाला बांबुने डोक्यात मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना चार तासात अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.26) रात्री घडला होता.

सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय-24), जयसिंग जलसिंग जुनी (वय-19 दोघे रा. पाटील इस्टेट, पुणे) यांना अटक केली आहे. तर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी नवनाथ कचरु काळे (वय-26) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत पेट्रोल पंपाचे मालक सचिन अनिल शहा हे जखमी झाले आहेत.

पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अंमलदार आदेश चलवादी यांना तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तीन अनोळखी
आरोपींचा शोध घेत असताना आरोपींची नावे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन
सखोल चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार पेट्रोल पंपावर दरोडा नसुन पेट्रोल भरण्यावरुन झालेल्या वादातून मारहाण
केल्याचे उघड झाले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक,
सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार भिवरे, सय्यद, रुपेश वाघमारे,
साठे, पवार, मेंगडे, केंगले, वाघ, निकाळजे, शितोळे, धावडे, धडस, तायडे, चलवादी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”