Pune : शिवाजीनगर न्यायालयातील वकिलास महिलेकडून 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवाजीनगर(Shivajinagar) न्यायालयातील वकिलास आज 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) रंगेहात पकडले आहे. हरिकिशन श्रीरामजी सोनी ( वय ५७) असे पकडलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात, उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड आणि पोशट्टीवर FIR

यातील तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयमध्ये खटला सुरू आहे. तो खटला चालविण्यासाठी तक्रारदार यांनी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांना वकील मिळावा म्हणून विनंती केली होती. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथोरिटीने अ‍ॅड. हरिकिशन सोनी यांची महिलेच्या बाजूने लढण्यासाठी शासनातर्फे नियुक्ती केली होती. सोनी यांना याबदल्यात शासनाकडून फी अदा करण्यात येते. तर नियुक्ती आदेशातही तक्रारदार यांनी वकिलांना कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही, असे नमूद असते. तरीही सोनी यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी ACB कडे तक्रार केकी होती. त्यानुसार आज सापळा कारवाईत 10 हजाराची लाच घेताना त्यांना पकडले गेले आहे.

 

आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रमाला मंत्री अनिल परब गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण

अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा इशारा, म्हणाले – ‘कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयार रहा’

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद