Pune : धक्कादायक ! अनैतिक संबंधातून अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न, पुरंदर तालुक्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधातून अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न घडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पण सुदैवाने एका सतर्क शेतकऱ्यांने हा प्रकार पाहिला आणि त्या अर्भकाचे प्राण वाचले आहेत. पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडीतील परिसरात दुचाकीवरून आलेले दोन तरुण एका नवजात अर्भकाला जिवंत पुरणाचा प्रयत्न करत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर त्यांनी दोघांना हटकले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी अर्भक तिथेच टाकून पळ काढला आहे. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अर्भक जेजुरी रुग्णालयात दाखल केले.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण खड्डा खोदत होते . परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी तरुणांना लांबूनच काय करताय? असे विचारले. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी अर्भकाला टाकून मात्र पळ काढला. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सासवड पोलीसांकडून त्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.