पुणे : स्किमचे प्रलोभन दाखवुन फसवणूक करणारा भामटा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विविध स्किम सांगून त्यामधून अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून महिलेला लुबाडणाऱ्या भामट्याला चार दिवसांत अटक करण्यात सायबर सेलच्या पोलिसांना यश आले आहे. या भामट्याला दिल्ली येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनिष सुभाषचंद्र बाबु उर्फ माथुर (वय-२५ रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सती गोपालन मधुमल (वय-६२ रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
[amazon_link asins=’B06WWRKRR3,B01DYDCERQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c732118-7f90-11e8-be4d-9f37c54b4590′]

आरोपी मनिष याने फिर्य़ादी मधुमल यांना फोनवर आणि घरी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने मधुमल यांना मोठ्या आर्थिक परताव्याचे, पेन्शन व इन्श्युरन्स, महिला आरक्षण स्किमचे प्रलोभन देऊन बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले. मनिषवर विश्वास ठेवून मधुमल यांनी वेगवेगळ्या खात्यांवर २० लाख रुपये भरले.  पैसे भरुन देखील परतवा न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीचा तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथील मनिष याच्या कॉल सेंटरवर छापा टाकून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल, एटीएम कार्ड, फिर्यादी यांचे दोन धनादेश असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B073Q4GGLW,B076PGZNRC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’142b4c2a-7f90-11e8-bffb-5108010b78f2′]

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग प्रदिप देशपांडे, परिमंडळ -३ चे पालीस उप आयुक्त गणेश शिंदे, चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याण विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, पोलीस नाईक सचिन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष गावडे, सायबर सेल पुणे शहर यांच्या पथकाने कामगिरी केली.