Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे काही तरूण ट्रेकिंग करत असताना अचानक दरड कोसळली. या दुर्घटनेत दरडीच्या दगडांखाली सापडून एका तरूणाचा मृत्यू झाला. या तरूणाचे नाव हेमांग गाला (Hemang Gala) असे आहे.

 

शनिवारी सुट्टी असल्याने हेमांग आणि त्याचे मित्र सकाळी सिंहगड येथे आले आणि चढण्यासाठी सुरूवात केली. काही वेळातच अचानक दरड कोसळली आणि हेमांग गाला बेपत्ता (Missing) झाला. यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे (Vittal Bonote) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी रात्री साडेअकारा वाजता हेमांगचा मृतदेह दगडांच्या ढिगार्‍याखाली सापडला. कोसळलेल्या दरडीच्या दगडांखाली सापडल्याने या तरूणाचा मृत्यू झाला. (Pune Sinhagad Fort Landslide)

 

शनिवार असल्याने गडावर खुप गर्दी होती. सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान गडावर शिरगणती केली असता एक तरूण ट्रेकर बेपत्ता असल्याचे समजले.
त्याच्या घरी फोन केला असता तो घरीसुद्धा पोहोचला नव्हता. इतरत्र शोध घेऊनही तो सापडला नाही.

 

तरूण बेपत्ता असल्याने राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) तक्रार करण्यात आली.
यानंतर वनविभागाने आणि स्थानिकांनी शोधमोहिम सुरू केली असता गडाच्या कल्याण दरवाजाजवळ दरड कोसळली असल्याचे आढळले.
ही दरड शंभर फूट खोल दरीत कोसळली होती. शोधकार्य सुरू असताना हेमांगचा मृतदेह रात्री साडेअकरा वाजता सापडला.

 

Web Title :- Pune Sinhagad Fort Landslide | landslide at sinhagad fort pune death of a hemang gala

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा