Pune Sinhagad News | कारवाई तर केली मात्र स्टॉल देण्यास वन विभागाची दिरंगाई, सिंहगड किल्ल्यावरील व्यवसायिकांचे कोणी वाली नाही !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad News | सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थ व इतर अनाधिकृत स्टॉलवर वन विभागाने (Forest Department) कारवाई करत येथील व्यवसाय बंद पाडले होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या कारवाईमध्ये दीडशेहून अधिक व्यवसायिकांचे व्यवयास जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी अधिकृत असलेल्या ७३ व्यवसांयिकांच्या नोंदी करून घेऊन, त्यांना रोजगार कुट्या देण्याचे आश्वासन वन विभागाने दिले. मात्र सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतेही स्टॉल्स यांना दिले गेले नाही. (Pune Sinhagad News)

सिंहगड हे पुण्याच्या आसपासच्या परिसरातील लोकांचे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. शालेय सुट्ट्यांमध्ये चिमुकल्यांसह अनेक पर्यटक येथे भेटी देतात व पिठलं भाकरीचा बेत आखतात. मात्र प्रशासनाने ऐन हंगामात हे सगळे अनाधिकृत स्टॉल (Unauthorized Stall) पाडले. त्यामुळे रखरखत्या उन्हामध्ये या व्यवसायिकांचे हाल होत आहेत.

खाद्यपदार्थ व्यवसायिकांना पर्यावरण पूरक अद्यायावत अशा कुट्या देण्यात येणार होत्या.
वनविभागाने नोंदणीकृत (Registered) ७३ व्यवसायिकांची यादीही तयार केली आहे.
या उपक्रमासाठी दोन कोटी रुपयांचा निधी (2 Crores Fund) देण्याची मागणी वन विभागाने स्थानिक
खासदार (MP), आमदार (MLA), तसेच जिल्हा नियोजन समितीकडे (District Planning Committee) केली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यात निधी मंजूर झाला नाही त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा कोणी वाली नाही हे लक्षात येते. वन व्यवस्थापन समितीच्या वतीने विक्रेत्यांना रोजगार कुट्या देण्यात येणार आहेत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे प्रस्ताव दिला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर दोन महिन्यात विक्रेत्यांना स्टॉल देण्याचे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी वनविभागाकडून या छोट्या व्यवसायिकांना देण्यात आले होते.

सिंहगड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाल (Pradeep Sakpal) यांनी या संदर्भात सांगितले आहे की,
“गडावर खादपदार्थांची विक्री करणाऱ्या नोंदणीकृत 73विकल्पांना रोजगार कुट्या देण्यात येणार आहेत.
त्यासाठी दोन कोटी रुपयाच्या निधीची गरज आहे. मात्र, अद्यापही निधी उपलब्ध न झाल्यामुळे
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ते देता आले नाहीत.”

या प्रकरणावर जिल्ह्या परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे (Navnath Parge) यांनी या
व्यवसायिकांना पावसाळ्यांपूर्वी स्टॉल न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Pune Sinhagad News)

Web Title : Pune Sinhagad News | Action has been taken, but the forest department is delaying to give the stall, the businessmen of Sinhagad fort have no qualms!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं

Jayant Patil ED Inquiry | ‘2024 नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे, याद्या तयार करायला घेतल्या’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरुन ठाकरे गटाचा इशारा

Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी