Pune Sinhagad Raod Police | पिस्तुल बाळगणाऱ्या 3 आरोपींना सिंहगड पोलिसांकडून अटक, पिस्तुल व काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Raod Police | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि 500 रुपयांचे दोन काडतुसे जप्त केली आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी ही कारवाई धायरी येथील रायकरमळा (Raikar Mala Dhayari) येथील शेतात केली.

नामदेव रामभाऊ ढेबे (वय-22 रा. मेधराज कॉम्पलेक्स, रायकर मळा, धायरी), आकास मच्छिंद्र कदम (वय-23 रा. खडक चौक, लोणारे वस्ती, धायरी), जय संगमेश्वर दयाडे (वय-19 रा. काळुबाई चौक, रायकरमळा, धायरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना माहिती मिळाली की, रायकरमळा येथील सुरज जाधव यांच्या शेतातील झाडाखाली तीन जण पिस्टल घेऊन थांबले आहेत. पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तीनजण झाडाखाली उभारल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्या अगझडतीत एक पिस्टल व दोन काडतुसे असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर,
पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ,
विजय विरणक, योगेस उदमले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांचा पुढाकार, दिशा भरकटलेली बालके खेळणार ‘स्लम सॉकर’ राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धेत