Pune : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बेकायदेशिररित्या पिस्तूल बाळगणाऱ्यास सिंहगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिंवत काडतुसे मिळून ३५ हजार ६०० रुपयांचा ऐजव जप्त केला.

मंदार श्रीधर दारवटकर (वय २४, रा. रेणूकानगरी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद पवार यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस आयुक्तालय हद्दीत विनापरवाना, बेकायदेशिररित्या शस्त्रे बाळगण्यास बंदी आहे.

दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष ठेवून पकडण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी मंदार वडगाव बुद्रुक परिसरात पिस्तूल आणि काडतुसे घेउन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल व काडतुसे मिळाले. चौकशीत त्याने हे मित्राचे असल्याचे सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक एस. एस. घाडगे करीत आहेत.