पुण्यातील सिंहगड रोड परिसरात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सिहंगड रोड परिसरात तुबंळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजेंद्र जाधव (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दाम्पत्यासह तिघांवर भादवी कलम 326, 323 सह इतर कलमनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 48 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन महिलासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव आणि संबंधित महिला हे वडगाव बुद्रुक येथील आनंत लक्ष्मी हिल्स सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. यावेळी फिर्यादी जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या रागातून कठीण वस्तूने डोक्यात मारून जखमी केले. तसेच त्यांना खालीपाडून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारले, असे तक्रारीत म्हटले आहे.

तर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत कात्रज परिसरात जात होत्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांची दुचाकी अडवून त्यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना लोखंडी रॉड व इतर हत्याराने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलीसानी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.