राजकीय पक्षाच्या महिला नेत्याबाबत सोशल मीडियावर ‘अश्लील’ मजकूर, पुण्यात 6 जणांवर FIR
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राजकीय पक्षाच्या एका राज्य स्तरावरील महिला पदाधिकाऱ्याबाबत सोशल मिडीयावर अश्लिल मजकूर लिहून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल हा प्रकार समोर आल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीकांत घोळवे, अमोल मुळे, गणेश जाधव, दशरथ मपलेकर, आसाराम सणस, मनिष चावरीया यांच्या विरोधात सिहंगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी ट्टिवटरवरून पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल 1Twit केले होते. त्यानंतर आरोपींनी त्याच्या फेसबुक अकाउंटवर खूपच अश्लिल भाषेत मजकूर लिहला आहे. त्यांच्या बद्दल असभ्य भाषा वापरून अश्लिल कमेंट देखील केल्या आहेत. यामुळे त्यांच्या मनास लज्जा होइल असे कृत्य केले आहे. या नंतर त्यांना सोशल मिडीयावर केलेल्या अश्लिल कमेंटची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.