Pune Smart City Company-ATMS | कॉंग्रेस, NCP चे काही नगरसेवक नेहमीप्रमाणे केवळ ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून आरोप करताहेत; सभागृहनेते गणेश बिडकर यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Smart City Company-ATMS | शहरातील वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून बसविण्यात येणार्‍या अत्याधुनिक एटीएमएस यंत्रणेच्या (Pune Smart City Company-ATMS) परिचालनाचा खर्च पुणे महापालिकेने (PMC) करण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनी संचालकांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यावेळी सर्व पक्षांच्या संचालकांनी पाठींबा दिला. स्थायी समितीमध्येही सर्वपक्षांनी पाठींबा दिला. परंतू कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) काही नगरसेवक केवळ ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेउन नाहक आरोपांची राळ उडवून शहर विकासाला बाधा आणत असल्याचा आरोप महापालिकेतील भाजपचे गटनेते व सभागृह नेते गणेश बिडकर (PMC Leader of the House Ganesh Bidkar) यांनी केला आहे.

 

शहरातील १२५ चौकांमध्ये स्मार्ट सिटीच्यावतीने वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी एटीएमएस ही स्वंयचलित यंत्रणा (Pune Smart City Company-ATMS ) बसविण्यात येणार आहे. यासाठी १०२ रुपये खर्च असून पुढील पाच वर्षे या यंत्रणेचे संचलन व देखभाल दुरूस्तीचे काम दिल्लीतील एका कंपनीला देण्यात आले आहे. यासाठीचा ५८ कोटी रुपये खर्च हा महापालिकेने (Pune Corporation) करण्यास नुकतेच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यावरून कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे (corporator arvind shinde) यांनी यामध्ये भ्रष्टाचार झाला असून याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांचे (kirit somaiya) मार्गदर्शन घेउन ईडीकडे (ED) तक्रार करणार असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषद घेउन दिली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी देखिल भ्रष्टाचाराने बरबटलेला हा प्रस्ताव विखंडीत करावा, अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे करणार असल्याचे जाहीर करत आज महापालिकेत (Pune Corporation) आंदोलनही केले.

यासंदर्भात सभागृहनेते गणेश बिडकर यांनी विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे स्पष्ट केले. अरविंद शिंदे हे नेहमी फक्त विकास कामांच्या ‘टेंडर’ आणि ‘ठेकेदारां’ बाबत बोलतात.
विकासकामांत अडथळे आणणे आणि प्रसिद्धी मिळविणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळामध्ये विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर हे संचालक आहेत.
ज्यावेळी हा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आला त्यावेळी त्यांनी पाठींबा दिला आहे.
तसेच स्थायी समितीमध्येही तीनही विरोधी पक्षाच्या समिती सदस्यांनीदेखिल पाठींबा दिला आहे.
आता त्यांच्या पक्षाचे अन्य नगरसेवक, पदाधिकारी का विरोध करतात? एटीएमएस यंत्रणेमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदतच होणार आहे.
तसेच ५८ कोटी रुपये खर्च हा पुढील सहा वर्षात टप्प्याटप्प्याने द्यायचा आहे.
केवळ निवडणुका जवळ आल्याने विरोधीपक्ष सवंग प्रसिद्धीसाठी हे आरोप करत आहेत.

 

एटीएमएस बद्दल काही ‘अनुत्तरीत’ प्रश्‍न

 

 २०१८ मध्ये काढलेली निविदा तीन वर्षांनी का मंजूर करण्यात आली.

 

 शहरातील २६१ पैकी केवळ १२५ सिग्नलच या यंत्रणेने जोडल्याने शहरातील अन्य चौकातील वाहतुकीचे नियोजन होणार?

 

 २०१८ मध्येच शहरातील चोवीस तास पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाला परवानगी देण्यात आली.
आतापर्यंत ३०० कि.मी. रस्त्यांची खोदाई करून लाईन टाकण्यात आली. यासाठी पुन्हा खोदाई, रिइन्स्टीटमेंट व रस्त्यांची कामे करावी लागणार. याला जबाबदार कोण?

 

 शहरातील प्रमुख चौकांमध्ये उभारलेले अत्याधुनिक सिग्नल व कॅमेर्‍यांचे नियंत्रण पोलिस यंत्रणेकडे आहे.
एटीएमएसची जबाबदारी पोलिसांकडे राहाणार कि महापालिकेकडे?

 

 एटीएमएस यंत्रणा कोलमडल्यास याची जबाबदारी कोणाकडे राहाणार?

२०१८ मध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्यसचिवांनी उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये एटीएमएस यंत्रणा उभारून स्मार्ट सिटीला शक्य नसल्यास महापालिकेला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान २०१८ नंतर महापालिकेचे चांगले रस्ते व पदपथ खोदूनच स्मार्ट सिटीने ‘तिजोरी’ रिकामी केली.
ती रिकामी केल्यानंतर तीन वर्षांनी निधी नसल्याचे कारण देत महापालिकेवर दायित्व टाकले. याला जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई होणार?

 

Web Title : Pune Smart City Company-ATMS | Some Congress, NCP corporators, as usual, make allegations only with the ‘contractor’ in mind; House Leader Ganesh Bidkar’s (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diwali Shopping Trends | व्हॉईस कमांड आणि मूडनुसार बदलेल तुमच्या घरातील प्रकाश

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात