Pune Smart City | स्मार्ट सिटी योजना ! नावलौकीक मोदींचे पैसा पुणेकरांचा – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील (Pune Smart City) एका कामासाठी महापालिकेने ५८ कोटी रुपये देणे म्हणजे नांवलौकीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढवायचा आणि पैसा मात्र पुणेकरांचा (Pune Smart City) खर्च करायचा असा उफराटा प्रकार आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Farmer MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

पुणे स्मार्ट सिटी (Pune Smart City) डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडला अॅडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पासाठी ५८ कोटी देण्याचा निर्णय महापालिकेच्या (Pune Corporation) स्थायी समितीने घेतला आहे. यावर टीका करताना जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे, शहरांच्या विकासासाठी ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना राबविली, त्यातून पुण्यात दोन हजार कोटींची कामे झाली. १४ साली मोदी सरकारनेही चांगली योजना बंद केली.

त्यानंतर गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजना आणली. देशातील १०० शहरांची निवड योजनेसाठी केली.
पुण्यासह एकाही शहरात योजना दहा टक्केही यशस्वी झालेली नाही.
अशा फसलेल्या योजनेतील कामांसाठी महापालिकेकडून पैसे मिळविणे चालू झाले आहे. पुणेकरांनी कररूपाने महापालिकेला दिलेला पैसा स्मार्ट सिटीला देण्याचा काय संबंध ?

स्मार्ट सिटीला निधी देत बसण्यापेक्षा महापालिकेने तीच कामे करावीत. मोदी सरकारच्या फसलेल्या योजनेसाठी पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

हे देखील वाचा

US Bans China Telecom | चीनला मोठा झटका ! अमेरिकेने चायना टेलिकॉमवर लावला प्रतिबंध

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

Platelet Count | प्लेटलेट काऊंट वेगाने वाढवतात ‘या’ गोष्टी, डेंग्यूसारख्या आजारात ‘या’ 5 चूका टाळा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune smart city pune people money pm narendra modi former mla mohan joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update