Pune : ….म्हणून पुणे पोलिसांनी मागितली मोक्क्यातील आरोपीकडे मदत, पुढं झालं असं काही, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या शिकलकरी टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या गॅंगला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. याकारवाईत पोलिसांनी या टोळीकडेच मदत मागितली अन् त्यांना पकडले आहे.

टोळी प्रमुख तीलकसिंग गबरसिंग टाक (वय 28), निशांत उर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय 23), सुनील प्रकाश गायकवाड (वय 23) आणि गणेश राजेंद्र शिवाडकर (वय 21) अशी अटक केलेल्या चौघाची नावे आहेत. तर दोघे पसार झाले आहेत. तीलकसिंग हा टोळी प्रमुख असून, त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यात त्याच्यावर ही कारवाई केली आहे. पण कारवाईनंतर तो फरार होता. यादरम्यान त्याचा गुन्हे शाखा कसून शोध घेत होती. मात्र तो मिळत नव्हता. या दरम्यान गुन्हे शाखा त्याचा माग काढत असताना तो आणि त्याची गॅंग उरुळी कांचन येथील डाळीगावजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा लावला. ते पांढरस्थळ कॅनॉल रोडने कार क्रमांक 7777 ही घेऊन येत असल्याचे समजले होते. यावेळी पथकाने येथे सापळा रचला. रस्त्यावर पोलिसांनी त्यांची कार बंद पडली असल्याचा बहाणा केला. या टोळीची कार येताच पोलिसांनी त्यांनाच मदत मागितली. त्यांनीही मदत म्हणून कार थांबवली. पण त्याचवेळी पथकाने त्यांची धरपकडं सुरू केली. यावेळी पथकाने चौघांना अटक केली. पण दोघे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

 

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक लोणारे, सहाय्यक निरीक्षक तासगांवकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहाय्यक उपनिरीक्षक तानाजी कांबळे, हवालदार लोखंडे (बक्कल नं. 5412), हवालदार लोखंडे (बक्कल नं. 5613), हवालदार शिंदे, खान, अभंगे, काळभोर, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे, चालक गंगावणे आणि युनिट- 5 मधील हवालदार मोराळे, वाघमारे, गायकवाड, चव्हाण, सय्यद यांच्या पथकाने केली.