Pune : पीव्हीपीआयटीनी जोपासली सामाजिक बांधिलकी – गिरीराज सावंत

पुणे,पोलीसनामा ऑनलाईन – उत्तम शिक्षण संस्था तीच असते, जी सामाजिक बांधिलकी मानणारे विद्यार्थी घडविते. समाजालाही सकारात्मक वैचारिक दिशा देते. त्या संस्थेने केलेल्या सामाजिक योगदानाच्या प्रमाणातसुद्धा तिची प्रगती मोजली जाते आणि जेएसपीएम व टिएसएसएम संस्था हे सर्व निकष पूर्ण करते, असे प्रतिपादन टिएसएसएम संस्थेचे सचिव गिरीराज सावंत यांनी केले.

बावधन येथील टिएसएसएम संचलित पद्यभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने फ्रंटलाइन कोरोना योद्धांना बावधन, चांदणी चौक, कोथरूड पीएमपी डेपो येथील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रेरणेने आणि सचिव गिरीराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, अनुविद्युत व दूरसंचार विभागप्रमुख डॉ. धीरज ढाणे व स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रविराज सोरटे उपस्थित होते.

डॉ. बुगडे म्हणाले की, मागिल वर्षभर आपण सर्वजण कोरोनाशी दोन हात करीत आहोत. त्यातही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसह त्यांचा सर्व स्टाफ कार्यरत आहे. फ्रंटलाइन कोरोना योद्धे पोलीस अधिकारी-कर्मचारी 24 बाय 7 कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पीव्हीपीआयटी संस्थेने पाणीवाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे पोलिसांकडूनही स्वागत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.