Coronavirus Lockdown : ‘तिची’ मदत ठरतेयं अनेकांसाठी जीवनाधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सर्वत्र ‘कोरोना’मुळे चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाउनमुळे अनेक जण अडकून पडले आहेत. स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, परप्रांतीय, तृतीयपंथी तसेच रेडलाईट एरीयामधील महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वातावरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सोशल मीडियावर स्वतःचा संपर्क क्रमांक देउन सर्वांना मदतीचे आवाहन केलेच. शिवाय आपल्या या अनोख्या सेवाभावी कार्याने इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांच्या या योगदानामुळे हजारो गरजूंची उपासमार थांबल्याचे चित्र दिसत आहे.

जाधव यांनी सांगितले, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून चौथ्यांदा देशभर लॉकडाऊन केले आहे. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यामुळे काही व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, पूर्णतः लॉकडाऊनच्या काळात अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळी राज्य आणि परराज्यातील मुलांचे जेवणाचे हाल झाले. तसेच हॉटेल्स बंद असल्याने खासगी हॉस्पिटलमधील रुग्णाच्या नातेवाईकांनाही खाण्यासाठी काही मिळत नव्हते, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांना शक्य तेवढ्या जास्तीत जास्त नागरिकांना चहा, जेवण देण्याची काम केल्याचे त्यांनी सांगितले.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।

घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।

कवी विंदा करंदीकरांच्या कवितेतील या ओळीप्रमाणे अडचणी सापडलेल्याना मदत करणे हा ‘माणुसकी’चा धर्म पाळणे कधीही महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरते. सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे देशभर लॉकडाउन असल्यामुळे मेस, खानावळ, हॉटेल बंद आहेत. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, मजूरवर्गाची उपासमार होऊ लागली. नेमकी गरज ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी जेवण देण्याचा उपक्रम तातडीने हाती घेतला. त्यामुळे अनेकांनी संपर्क साधल्याने अनेकांची भूक भागली, नव्हे तर त्यांना जेवू घालण्याचे पुण्यच मला मिळाले.

लॉकडाऊनमध्ये एक कुटुंब शहरात अडकले होते. महिला गरोदर होती, तिला नऊ महिने झाले होते. या दोघांबरोबर कोणी नव्हते, त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्यांना घरी पोहोचवले आणि तिची लगेच डिलिव्हरी झाली. पुण्यकर्म म्हणजे याहून दुसरे काय असते बरे ! अलीकडे रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याऐवजी त्यांची तक्रार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या बंद असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना सकाळी बिस्किटे आणि सायंकाळी दूधभात, दहीभात आणि बिर्याणी खाऊ घालण्याचे काम मागिल दीड महिन्यपासून सुरू ठेवले आहे.

….आणि मुलांची गैरसोय दूर झाली
नंदिता जाधव यांनी मदतीसाठी आवाहन केल्यानंतर राज्य आणि परराज्यातून अनेकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधून सांगितले की, आमची मुले पुण्यामध्ये आहेत, ती घाबरून गेली आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. यानंतर त्यांनी स्वतः तात्काळ त्या मुलांना जेवण देणे सुरू केले. या उपक्रमात काही संस्थांनीही मदत केली. लॉकडाऊनमुळे मला शहरात जाणे शक्य नव्हते, त्यामुळे हडपसर परिसरातील मुलांची गैरसोय दूर केली. मात्र, संस्थेच्या माध्यमातून पुण्यातही मुलांना जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

रेडलाईट एरियामधील महिलांना दिला आधार
लॉकडाऊनमध्ये रेडलाइन एरियामधील महिलांसाठीसुद्धा काम करण्याचे ठरविले. रेडलाईट एरियामधील महिला तेथे चरितार्थ चालवितात मात्र, तेथे स्वतः जाऊ शकत नसल्यामुळे पैशाच्या माध्यमातून सहेली संस्थेला मदत पोहोचविली. ही बाब इतर संस्थांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनीही त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा केले, ही बाब माझ्यासाठी सुखावह ठरली. रेड लाइट एरियामधील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी त्यांना सॅनिटरी नॅपकिन पोहोचवले.

हीच तर खरी माणुसकी….
ज्यांचे पोट भरले आहे, त्यांना जेवण घालण्यात अर्थ नसतो, जे उपाशीपोटी आहेत, त्यांना जेऊ घालण्यातले समाधान काही वेगळेच असते. धुणीभांडी करणाऱ्या महिलांना धान्यरूपी मदत केली. समाजामध्ये तृतियपंथी समाज आहे. रस्त्यावर पैसे मागून चरितार्थ चालवितो. मात्र, सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांनाही मदतीची गरज असल्याचे ओळखून तयार जेवण, धान्य आणि आर्थिक मदत दिली. पुढील दीड महिना पुरेल एवढे किमान किराणा मालाचे साहित्य दिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like