भारतीय मजदूर संघाने दिला बीडी कामगारांना दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   करोना महामारी चा सर्वांत जास्त फटका बीडी कामगारांना बसला असुन काम बंद असल्याने हाता वर पोट असणारी बीडी कामगारांची अवस्था बिकट झाली आहे.

त्या मधून सावरण्या साठी दि 30/05/2020 रोजी भारतीय मजदूर संघाचे कार्यालयात मदत केंद्रा तर्फे मार्गदर्शन केले. बीडी कामगारांच्या Lockdown कालावधीतील समस्या व परत काम सुरू करण्या साठी पुण्याचे खासदार मा. गिरीश बापट यांना निवेदन दिले, व ओंमकारेश्वर मंदीर ट्रस्टतर्फे गरजु कामगारांना धान्याचे किट व आर्थिक मदत करण्यात आली.या प्रसंगी खासदार गिरीश बापट, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत धुमाळ , उपाध्यक्ष सुभाष सावजी, अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद,जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण ,ट्रस्टी अरूण जोशी, व अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सेक्रेटरी सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शासनाच्या नियमांचे, सामाजिक अंतराचे भान पाळुन या कार्यक्रम करण्यात आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like