840 कर्मचाऱ्यांची ‘कोरोना’ चाचणी ! शिबिराचं केलं होतं पुणे व्यापारी महासंघानं आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालीका व पुणे व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बुधवार ,गुरवार व शुक्रवार रोजी एकूण 840 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. सुरवातीच्या टप्प्यात लक्षमी रोड येथील दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना ची तपासणी करण्यात आली.

तपासणी साठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव,मोबाईल क्रमांक,राहण्याचा पत्ता व आधार कार्डची झेरॉक्स घेण्यात आली.

यादरम्यान 840 पैकी फक्त 26 कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणजे अंदाजे ३ टक्के कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली परंतु या सर्वांना कोणतीही लक्षणे नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले व ज्यांना शक्य नाही त्यांना महानारपालिकेच्या विलीगीकरण कक्षात भरती केले.

सदरहू शिबीर पुढील सातही दिवस चालू राहणार असून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी न घाबरता चाचणी करून घ्यावी असे आवाहन अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी केले आहे .

येणाऱ्या काळात विभागवार व वेगवेगळ्या असोसिएशन च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येतील असे सचिव महेंद्र पितळीया यांनी जाहीर केले.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मा हेमंत रासने,स्थायी समिती अध्यक्ष श्रीमती रुबल अग्रवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त, श्री आशिष महाडदळकर, महापालिका सहाय्यक आयुक्त, कसबा विश्रामबागवाड़ा क्षेत्रीय कार्यालय,यांनी बहुमोल सहकार्य केले. तर शिबीराचे आयोजन करण्यासाठी दिनेश सांकला,राजेश शेवाणी ,मिलिंद शालगर,योगेंद्र अष्टेकर,नरेश राठोड ,यशस्वी पटेल यांनी विशेष प्रयत्न केले.