उन्हाळ्यातही बहरली बकोरी डोंगरावर 18 हजार झाडे, वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचा अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे मागिल 22 मार्चपासून पहिल्यांदा 21 दिवसांचे देशभर लॉकडाऊन केले. त्यानंतर दुसऱ्यांदा सात दिवसांचे लॉकडाऊनचा कडाका वाढत असल्याने पाण्याअभावी वृक्षांची हानी होऊ नये, यासाठी वृक्षमित्र  केले. मात्र, तिसऱ्यांदा लॉकडाऊन केल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, उन्हाचंद्रकांत वारघडे यांनी लॉकडाऊनमध्ये आपले काम सुरू ठेवून 18 हजार झाडांना पाणी देण्याचे काम अविरतपणे करीत आहेत.

बकोरी (ता. हवेली) येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी उघडाबोडका डोंगर हिरवाईने नटवला आहे. या कामासाठी त्यांचा मुलगा धनराज, मुलगी धनश्री परिवार झाडांना दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत पाणी घालत आहेत. त्यांनी येथील डोंगरावर देशी झाडांची लागवड केली असून, ऑगस्टपासून झाडे जगविण्यासाठी वारघडे परिवार काम करीत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी दोन महिने झाडांना पाणी द्यावे लागणार आहे.

त्यासाठी दररोज एक हजार 200 रुपये स्वखर्चातून वारघडे करीत आहेत. वृक्षरोपणाचा उपक्रम हाती घेऊन तीन वर्षे झाली आहेत. त्यांचा हा उपक्रम अविरत सुरू असल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. बकोरीतील डोंगरावर सुमारे दोन लाख विविध जातींची देशी झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे.