‘कोरोना’ योद्धांना मदत करावी : जाधव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कोरोना योद्धांना काही ना काही तरी मदत करण्याची गरज आहे. हॉस्पिटलमधील वॉचमन, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, स्वच्छता दूत यांना जेवण, तर पोस्ट कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चहा आणि मूक्या प्राण्यांना बिस्कीट आणि खाद्यपदार्थ देण्याचे काम मागिल 38 दिवसांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव करीत आहेत.

हडपसर पोस्ट कार्यालयामध्येसुद्धा जाधव अधिकारी-कर्मचाऱ्यांना तीन वेळ चहा देत आहेत, असे पोस्ट मास्तर एन. एस. बनकर यांनी सांगितले. दरम्यान, बनकर म्हणाले की, लॉकडाऊनमुळे नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचे काम केले जात आहे. सध्या 8 ते 9 कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिली जात असून, कोणाही नागरिकांची अडचण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.