PM CARE फंडासाठी धनादेश देऊन् अनोख्या पध्दतीनं साजरा केला वाढदिवस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना जिवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आदित्य कालिदास जागडे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता 27 व्या वाढदिवसादिवशी 27 हजार रुपयांच्या रक्कमेचा धनादेश PMCare ला दिला. हा धनादेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिला. आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ, कालिदास जागडे, नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेविका प्रभा मटाले, अरुण वीर, तसेच सर्व मित्रांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य जागडे यांनी 27 हजार रुपयांचा धनादेश महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे शनिवारी (दि.23) सुपूर्द केला.

राज्यात कोरोनाचे संकट असून अनेक उद्योगधंदे, व्यावसाय बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करत असलेल्या गरजू लोकांना दररोजच्या गरजा भागविण्यासाठी अन्नधान्याचे किट व भाजी पाल्याचे किट महापौर मुरलीधर मोहळ, मानसी देशपांडे, प्रभा मटाले, अरुण वीर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आदित्य जागडे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू लोकांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

गरजूंना धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. आदित्य जगाडे यांच्या 27 व्या वाढदिवसानिमत्त प्रभाग क्रमांक 36 पापळवस्ती बिबवेवाडी येथील गरजू लोकांना अन्नधान्य आणि भाजी पाल्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी मनोज देशपांडे, कुणाल माने, सनी साळवे, दादा जानकर, प्रशांत सास्टे, बाबा जागडे, अभिजीत पवार, तुषार थोरात,दादा जानकर यांनी विशेष सहकार्य केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like