सलाम ! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी हिंदू-मुस्लिम तरुणांचा पुढाकार, ईदच्या पुर्वसंध्येला माणुसकीचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – केसनंद (ता: हवेली) राहणारा एका हिंदू समाजातील वृध्द भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या वयोवृध्द व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे जवळ आप्तस्वकीय कोणी नव्हते. त्यामुळे त्याच्या अंत्यसंकार कसे होणार हा प्रश्न निर्माण झाला असतानाच.हिंदू मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेत हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले. सध्या संचारबंदी, लाॕकडाउन च्या परिस्थिती मध्ये जर कोणी मृत पावलं तर त्यांच्याकडे कोणाला सुद्धा जाता येत नसल्याचे चित्र आपणास सर्रास पहावयास मिळत आहे.अशीच एक घटना पुण्याजवळील केसनंद मध्ये घडली घडली.

एका हिंदू समाजातील वृध्द व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे वेळेवर,पोहोचू शकले नव्हते .मात्र याचवेळी गावातील सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत हिंदू मुस्लिम बांधवांनी त्या वृध्द व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.केसनंद येथील राम शेकू क्षीरसागर असे निधन झालेल्या व्यक्ती चे नाव असून त्याच्या जवळ कोणीही नसल्याने त्यांच्या अंत्यविधी कसा करणार हा प्रश्न उभा राहिला.अशावेळी परिसरातील राहणारे मुस्लिम हिंदू बांधव पुढे आले. सामाजिक एकोपा जपत हिंदू मुस्लिम बांधवांनी राम शेकू क्षीरसागर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू समशानभूमीमध्ये ‘राम नाम सत्य है’ चा जप करत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

यावेळी जानमहमद पठाण,आप्पा शेख,रहिमभाई शेख,आसीफ शेख,शद्दाम शेख,अलताप शेख,साहेबराव जगताप,बच्चन आंळदे गावचे पोलिस पाटिल पंडित हरगुडे यांनी पुढाकार घेत हा शेजारधर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो त्यांनी पार पाडला आणि अशाच माणुसकीची गरज सध्या या परिस्थितीमध्ये आहे,असं सांगितलं.कोरोनाच्या या महामारीत अशा सामाजिक हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या घटनाचे माणुसकीचे नवे दर्शन दाखवत आहेत.