रुतलेल्या तीनचाकीला समाजसेवकांचा ‘आधार’

पुणे  : प्रतिनिधी –  कोरोना विषाणूळे मागिल पावणेतीन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे रस्त्यावर तीन चाकी चालवून स्वतः आणि समाजाची मदत करतात. मात्र, रिक्षाची चाके रुतली आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा बाका प्रसंग आला. त्यांच्या मदतीसाधी समाजसेवकांनी धाव घेत धान्यरुपी मदतीचा आधार दिला. रिक्षा थांबली तरी कुटुंबाला मदत मिळाल्याची भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

रिक्षाचालकांच्या भावनांची कदर करत कात्रजमधील विकासनामा फाटे, दिनकर फाटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडियातून रिक्षावाल्या काकांच्या मदत करणार असल्याचे जाहीर केले. आज कर्तव्य म्हणून त्यांनी सुमारे 200 रिक्षाचालकांना धान्याचे कीट दिले. उर्वरित रिक्षाचालकांना उद्या देण्यात येणार असल्याचे फाटे यांनी सांगितले.

फाटे म्हणाले की, लॉकडाऊनमुळं गेली दोन-तीन महिने एकाच जागेवर थांबलेली रिक्षा पाहाण्याची शिक्षा पाहिली. हजारो संसार या तीन चाकी रिक्षांवर चालतात. रिक्षा धावली, की त्यांचे संसारही चालतात. मात्र, कोरोनाचे संकट कोसळलं आणि रिक्षाचं चाक ‘लॉकडाऊन’मध्ये रुतून बसलं. त्यामुळं तीन चाकांवरचा संसारही अचानक थांबला. कुणाचं घरभाडं थकलंय तर कुणाचा हप्ता, अशा एक ना अनेक समस्यांनी रिक्षावालांना ग्रासले आहे. त्यांना पुढील काही दिवस पुरेल एवढे धान्याचे कीट देऊन आधार दिल्याचे त्यांनी सांगितले.