लॉकडाऊन व रमजानच्या काळात गरजू लोकांसाठी हाजी तौसिफ शेख ठरले ‘ देवदूत ‘ ! 2 महिन्यापासून 5000 लोकांना अन्न धान्य किट, 25000 लोकांनाइफ्तार साठी फळे, 150 जणांना दिले रोजगार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांचे काम धंदा बंद पडले. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही घरात अन्नाचा कण नाही, अशी अवस्था हजारो गोरगरीबांची झाली. यावेळी मीम इत्तेहाद सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी तौसिफ शेख यांनी केवळ 5000 लोकांना धान्य वाटप करुन थांबले नाही तर १५०जणांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्यासाठी ते देवदूतापेक्षा कमी नाही, अशी भावना या रोजगार मिळालेल्यांनी व्यक्त केली.

 

पुणे शहरात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मुंबई खालोखाल सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. कोंढवा परिसरातही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आणि होम क्वारंटाईन झालेल्यांची संख्या अधिक आहे. याबरोबरच छोटे मोठे व्यवसाय करुन उपजिविका करणार्‍यांची संख्या तेथे जास्त आहे.

हे लक्षात घेऊन हाजी तौसिफ फारुक शेख यांनी कोंढवा परिसरातील नावजीश पार्क, पाच नंबर गल्ली, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, सर्व्हे नंबर ४२, सवेरा पार्क, एनआयबीएम रोड, मोहम्मदवाडी, काशीवाडी, लोहियानगर या ठिकाणी 5000 लोकांना अन्न धान्य व 25000 लोकांना रमजानच्या इफ्तार साठी फळे यांचे वाटप केले. शेतकर्‍यांकडून भाजीपाला, फळे विकत घेऊन तो बेरोजगार १५० जणांना ना नफा ना तोटा तत्वावर देण्यात येतात. त्यातून त्यांना रोजगाराचे मोठे साधन मिळाले आहे.

 

रमजानच्या पवित्र महिन्यात कन्टेन्मेंट क्षेत्रातील मुस्लिम बांधवाना उपवास सोडण्यासाठी फळे, दुध मिळणे मुश्किल होते. लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी रमजानच्या महिन्यात १२ संस्थांच्या सहकार्याने २५ हजार लोकांना इफ्तारसाठी फळे वाटप केले.

उत्तर प्रदेश, बिहारासाठी रेल्वेगाड्या सुरु झाल्या. तेव्हा कोंढवा भागातील ७० परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहचविण्याचे काम पोलिसांवर आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मदतीची हाक देताच हाजी तोसिफ शेख हे तातडीने पुढे सरसावले. त्यांनी या कामगारांना आवश्यक असलेली सर्व मदत देऊ केली. पोलीस प्रशासन , डॉक्टर्स व मनपाचे सफाई कामगार यांना सतत मास्क हँड ,सॅनिटाईझर वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर ,कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांचे हस्ते देण्यात आले .

आतापर्यंतच्या २ महिन्यांच्या काळात त्यांनी ही सर्व मदत स्व: खर्चाने केली आहे. त्यासाठी कोणाची आर्थिक मदत घेतलेली नाही. याबाबत तौसिफ शेख यांनी सांगितले की, अल्लाची कृपा असल्यानेच रमजान सारख्या पवित्र महिन्यात गरजू, गरीब लोकांना मदत करण्याची संधी मला मिळाली. माझा मोबाईल नंबर मी सोशल मिडियावर टाकला आहे. यापुढेही ज्यांना अन्नधान्यांची मदत लागले, त्यांनी या नंबरवर कॉल केल्यास त्यांना मदत दिली जाईल.