Pune Social Welfare Department – Dhangar Samaj | धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

पुणे : Pune Social Welfare Department – Dhangar Samaj | धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Social Welfare Department – Dhangar Samaj)

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजनाबरोबर इतर सोई-सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात.

या योजनेंतर्गत शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज,
आळेफाटा (ता. जुन्नर), एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल (सीबीएसई) अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, वाघळवाडी
(ता. बारामती) आणि एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, वनगळी (ता. इंदापूर) या तीन शाळांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील धनगर समाजातील पालकांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी तसेच विधवा,
घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊन
योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता डावखर
(Pune Assistant Commissioner of Social Welfare, Sangita Davkhar ) यांनी केले आहे.

Web Title :- Pune Social Welfare Department – Dhangar Samaj | Admission to reputed residential schools of English medium for Dhangar community students

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान

Rahul Gandhi Disqualification | शिक्षा झाली मात्र आमदारकी गेली नाही, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील ‘हे’ आमदार चर्चेत

Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही – मंत्री उदय सामंत