Pune-Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 1 जखमी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे – सोलापूर महामार्गावर आज पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांचा विचित्र अपघात (Pune-Solapur Highway Accident) झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयासमोर झाला. या भीषण अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनरचा मृत्यू (Death) झाला तर कंटेनरमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे. Pune-Solapur Highway Accident | terrible accident pune solapur highway two were killed and one was seriously injured

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

लोणी काळभोर पोलीसांनी (Loni Kalbhor police) दिलेल्या माहितीनुसार,
या अपघातात ट्रक चालक अनिल अंकुश सूर्यवंशी (रा. केळगाव, ता. निलंगा, लातूर) तर क्लिनर शकील इस्माईल शेख (रा. बसवकल्याण, जि बिदर, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला आहे.
तर कंटेनर चालक आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय-44 रा. मुंढवा, पुणे) गंभीर जखमी झाले
असून त्यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior police inspector Rajendra Mokashi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर आज (शुक्रवारी) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास धनश्री मंगल कार्यालयासमोर एक कंटेनर वळण घेत असताना पुण्याकडून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने त्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला व चालक व सहायक दोघे ठार झाले.
तर कंटेनरच्या समोरच्या भागाला सोलापूर कडून येणाऱ्या फरशीच्या ट्रकने धडक दिली.
त्यात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला.
तिन्ही अवजड वाहने एकमेकांना धडकलेने मोठा आवाज झाला.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना कळवली.

लोणी काळभोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली थेऊर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी (Assistant Police Inspector Shrishail Chivadshetti) करीत आहेत.

Web Title : Pune-Solapur Highway Accident | terrible accident pune solapur highway two were killed and one was seriously injured

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण