गणेशखिंड रस्त्यावरील पेट्रोल पंपावर टोळक्याचा ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशखिंड रस्त्यावरील पेट्रोल पंपावर टोळक्याने राडा घालत मालकासह दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोंधळ घालत असल्याची माहिती दिल्याने हा प्रकार घडला.

रमेश मारणी असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी रशिद शेख (वय ५१, रा. गोखलेनगर) यांनी चतुशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८ ते १० जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रस्त्यावर रमेश यांचा श्रीसेवा पेट्रोलपंप असून काल दुपारी ते रशिदसह गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पेट्रोलपंपाजवळ असलेल्या गॅरेजमध्ये ८ ते १० जण मद्यपान करुन गोंधळ घालत होते. त्यामुळे रमशे यांनी सतीश धोत्रेंना फोन करुन माहिती दिली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने रमेश यांच्यासह रशिदला रॉड आणि बीअरच्या बाटल्यांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे अधिक तपास करीत आहेत.