पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावरील ‘त्या’ मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यास भररस्त्यात ‘दाखवल’ पिस्तुल, शहरात प्रचंड ‘खळबळ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास भरवर्दळीच्या ठिकाणीच स्कॉर्पिओतुन आलेल्या एकाने पिस्तुल दाखविल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी या कर्मचाऱ्याने मद्यपान केल्याने त्याचे मेडिकल करण्यास पाठविण्यात आले आहे. मात्र, या कर्मचाऱ्याची रविवारी सप्ताहीक सुट्टी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी शिवाजीनगर लाईन येथे राहण्यास आहे. रविवारी रात्री नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकात होता. त्यावेळी एका स्कॉर्पिओ तेथे आली. तसेच त्यातील एकाने थेट या कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखले. दरम्यान काही क्षणात परिसरात गोंधळ उडाला. पोलिसावर पिस्तुल रोखल्याची ‘खबर’ पूर्ण शिवाजीनगर लाईन आणि पोलिस दलात पसरली आणि एकच खळबळ उडाली. अनेकांनी येथे धाव घेतली. लाईन बॉय आणि काही कर्मचारी येथे आले. यावेळी झालेल्या झटापटीत पिस्तूलचे कव्हर काही जणांच्या हाती लागले आहे. तसेच पोलिसांना कारचा क्रमांक मिळाला आहे. त्यावरून संशयित आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक परिसरात सायंकाळी 6 नंतर वाहतूक असते. अनेकजण येथे चहा पीण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथील परिसरात गर्दी असते. अशा भरवर्दळीच्या वेळीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वैयक्तिक कारणांवरून हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like