पीएमपी बसचालकाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून पीएमपी बस चालकाशी वाद घालून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला पकडले आहे.

गणेश वनराज बिर्‍हामणे (वय 30, रा. आंबेगाव खुर्द)असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक शंकर कोंढाळकर (वय 30, रा. कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, त्याचे दोन साथीदार पसार झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर हे पीएमपीएल बसचालक आहेत. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कात्रज बायपासने उजवीकडे वळण घेउन दत्तनगर चौकात बस घेउन जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या गणेशने बससमोर दुचाकी आडवी लावली. तू मध्ये का आला अशी विचारपूस करीत त्याने बसचालक शंकरला शिवीगाळ केली. तसेच वाद घातला. त्यानंतर बसमध्ये शिरुन मारहाण केली. त्यावेळी गणेशच्या इतर दोन साथीदारांनी बांबूने शंकरला मारहाण केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

You might also like