वीज कनेक्शन तोडल्यानं महावितरणमध्ये राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लाईटचे कनेक्शन तोडल्यावरून हडपसरमधील महावितरणच्या कार्यालयात जाऊन एकाने कर्मचार्‍यास शिवीगाळकरून राडा घातल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सखाराम कळासे (वय 57, रा. मगरपट्टा हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, माणिक डांगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळासे हे महावितरण कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, महावितरणकडून आरोपी यांच्या ओळखीतील लक्ष्मी पाटील यांचे लाईटचे कनेक्शन तोडले होते. त्याचा राग आरोपीला आल्याने तो गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आला. तसेच, त्याने कर्मचारी संचिन अंभोरे याला लाईटचे कनेक्शन का तोडले असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फिर्यादी त्याला समजावत असताना ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

You might also like