Pune | युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा मंत्री दत्तात्रय भरणे व धिरज केसकर यांच्याकडून विशेष सत्कार

इंदापूर : Pune | राज्यमंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व वालचंदनगर कंपनीचे जनरल मॅनेजर धिरज केसकर यांनी युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा विषेश सत्कार करत अभिनंदन (Pune) केले.

वालचंदनगर येथील अक्कलकोट राहिवासी आणि सध्या डीआरडीओ पुणे येथे जॉइंट डायरेक्टर पदावर कार्यरत असलेले युवा वैज्ञानिक भीमाशंकर स्वामीराव गुरव यांना केंद्र सरकारच्या वतीने यंग सायंटिस्ट ऑफ इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल वालचंदनगरमध्ये गुरव यांचा ठिकठिकणी सत्कार करण्यात आला.

भीमाशंकर यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चमक दाखविली होती.
महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर केरळ येथे वैज्ञानिक क्षेत्रातील पदवी घेतली.
त्यांचे बुद्धिकौशल्य पाहून डीआरडीओने त्यांना नोकरीची संधी दिली. या संधीचे सोने करीत

भीमाशंकर गुरव यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील नवनवीन तंत्र विकसित करून संरक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविला.
त्यांना डीआरडीओचे जॉइंट डायरेक्टर पद देण्यात आले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात भेदक डिझाईन तयार केले,
याची नोंद संरक्षण दलाने घेतली. त्यांना यंग सायंटिस्ट ऑफ इयर म्हणून गौरविले.
गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करीत अभिनंदन केले. यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीजचे कंपनी वरिष्ठ व्यवस्थापक धिरज केसकर, राहुल माने, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मोहन यादव, जेष्ठ पत्रकार अतुल तेरखडकर, वालचंदनगर सरपंच कुमार गायकवाड, कळंबचे सरपंच विद्या सावंत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगरचे अध्यक्ष रमेश देशपांडे, सचिव अमोल राजपूत, सहकारी पुरवठा भांडार संस्थेचे सचिव सुनील साबळे अनेक मान्यवर (Pune) उपस्थित होते.

हे देखील वाचा

Drinking Water And Health | जाणून घ्या आरोग्यासाठी केव्हा, का आणि किती पाणी पिणे आवश्यक

Ovarian Cancer | ‘या’ गोष्टी वाढवू शकतात कॅन्सरचा धोका, अंडे आणि कॉफी आवडणार्‍यांनी सुद्धा व्हावे सावध; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune | Special felicitation from young scientist Bhimashankar Gurav by Minister Dattatraya Bharane and Dhiraj Keskar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update