पोलीसनामा विशेष : तडीपार गुन्हेगारांवर ‘फेस रेडिंग’ अँपद्वारे ठेवली जाणार ‘नजर’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांवर आता फेस रेडिंग अँपद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे तडीपार कालावधीत पुन्हा शहरात येता येणार नसून ते परवानगी न घेताच शहरात दाखल झाल्यास त्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होणार आहे. पुणे पोलिसांनी सध्यस्थिती जवळपास 200 हुन अधिक गुन्हेगारांना शहरातून तडीपार केलेले आहे. 3 वर्षांपूर्वी हा आकडा 500 पेक्षा जास्त होता. मात्र तडीपार गुन्हेगार या कालावधीत देखील शहरात येऊन गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. दत्तवाडी येथे गुंड चॉकलेट सुन्या याने तडीपार असताना देखील टोळीच्या वर्चस्व वादातून निलेश वाडकर याचा जनता वसाहत येथे येऊन गोळ्या झाडत खून केला होता. तर नुकतीच एका तडीपार केलेल्याने घरी आईलाच मारहाण केली होती.चतुःश्रुगीत तडीपार गुन्हेगाराने घरफोड्या केल्या होत्या.

त्यामुळे तडीपारी कारवाई फक्त नावालाच आहे का, असा प्रश्न देखील निर्माण होत होता. तर पोलिसांचा मूळ उद्देशच साध्य होत नसत. पोलिसांना कामे सोडून या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवावे लागत. त्यामुळे याला आळा कसा घालणार याबाबत अनेक उपाययोजना करण्याचे प्रयत्न होत. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. दरम्यान तडीपार केल्यास त्याला एका शहरात नेहून सोडले जाते. तसेच त्या पोलीस ठाण्यात त्याची नोंद केली जाते. यात साधारण 1 ते 3 वर्षाचा तडीपारीचा कालावधी असतो. पण तो इतके दिवस तेथे थांबत नाही. मात्र आता पोलीस या ऑपद्वारे लक्ष तर ठेवणार आहेतच, पण त्यांना बसल्या ठिकाणी तो शहरात आला की त्याला सोडलेल्या शहरातच आहे हे कळणार आहे.

—चौकट—
कोरोनाचे अँप आले मदतीला
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एकाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वाराटाईन करण्यात येते. मात्र या गंभीर काळात देखील होम क्वाराटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर पडत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेत एच.क्यु.टी.एस. (होम क्वाराटाईन ट्रॅकिंग सिस्टीम) हे ऑप तयार करण्यात आले. त्यात फेस रेडिंग व जीपीएस याचा सहभाग करून ही सुविधा तयार केली. तसेच क्वाराटाईन केलेल्या व्यक्तीस त्याच्या मोबाईलमध्ये हे ऑप डाऊनलोड करण्यास सांगितले गेले. त्याने दररोज ठरवून दिलेल्या जागेवर जाऊन फोटो काढून (सेल्फी) तो अपलोड करण्याचा. त्यावर यंत्रणेला समजत असे की तो घरातच आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा या आपत्कालीन परिस्थितीत झाला आहे. याच ऑपची आता पोलीस मदत घेणार आहेत.

—चौकट—
असे आहे अँप…
कोरोनाच्या काळात विकसित करण्यात आलेले ऑप आता पोलिस फेस रेडिंग (Face Recognition) तयार करण्यात येत आहे. त्यात देखील जीपीएस या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे यात त्या तडीपार केलेल्या व्यक्तींच्या स्वत्रत्यावर गदा येणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात आली आहे. या ऑपचे काम सुरू करण्यात आले असून, पुढील आठ दिवसात कार्यान्वित करण्यात येईल. त्यानंतर शहर पोलीस दल त्याचा वापर करतील. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे या ऑप सुरू करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी काम करत आहेत.

—चौकट—

अशी ठेवली जाणार नजर…
शहर पोलीस दल फेस रेडिंगनुसार काम करेल. तडीपार केलेल्या विक्तीला दररोज फेसचा फोटो त्याच्या मोबाईलवर अपलोड करावा लागेल. त्याने फोटो अपलोड केल्यानंतर जीपीएसद्वारे पोलिसांना त्याचे लोकेशन कळेल. तसेच फोटो अपलोड केल्यानंतर तो शहरात आला तर लागलीच पोलिसांना समजेल आणी पोलिस त्याला पकडतील. या अँपमुळे पोलिसांना मोठा फायदा होणार आहे. तसेच घडणाऱ्या समभाव्य घटना देखील टळणार आहेत.