Pune SPPU News | परीक्षा अर्ज न भरता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, एक दिवसाची मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune SPPU News) उन्हाळी सत्र परिक्षांचे (Summer Session Examinations) अर्ज जमा करण्याची तारीख उलटून गेली आहे. मात्र काही कारणास्तव हजारो विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यास मुकले आहे. अनेकांनी ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुदतवाढ देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (Board of Examination and Evaluation) गुरूवारी (ता.२५) एक दिवस ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune SPPU News)

 

दरवर्षी विद्यापीठात संलग्न असलेल्या पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar) व नाशिक (Nashik ) जिल्ह्यामधून सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज (Exam Application) परीक्षा विभागाकडे प्राप्त होतात. यावर्षी मात्र अनेक विद्यार्थी मागे राहिले असून यासर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिली आहे. महाविद्यालयांनाही एक दिवस अर्ज इनवर्ड करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे.

 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या (New Education Policy) अंमलबजावणीसाठी विद्यापीठाकडून येत्या ऑगस्ट महिन्यापूर्वी परीक्षा घेऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने मे महिन्यापर्यंत परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदत दिली. परंतु, या मुदतीमध्ये सुमारे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. अनेक स्तरातून या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

यावर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे (Dr. Mahesh Kakade) यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहेत की, आत्तापर्यंत सुमारे ५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.
काही कारणास्तव परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक दिवस परीक्षा अर्ज भरण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
२४ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून २५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरू शकतील.
२६ मे रोजी विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज कॉलेजकडून तपासून विद्यापीठाकडे पाठविला जाईल. (Pune SPPU News)

 

 

 

 

Web Title :  Pune SPPU News | last date for filling sppu summer session
exam application form website will open for one day on thursday may 25

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा