Pune SPPU | पुणे विद्यापीठातील विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश; प्रशासनाने घेतली आंदोलनाची दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Savitribai Phule Pune University (SPPU) भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह इतर मागण्यांबाबत विद्यार्थी सलग तीन दिवसांपासून मुख्य इमारत परिसरात भर पावसामध्ये बेमुदत घंटानाद आंदोलन (Movement) करत होते. अखेर प्रशासनाकडून (Administration) या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून विद्यार्थ्यांना सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवले आहे. (Pune SPPU)

 

मागील तीन दिवसांपासून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडून (University Student Struggle Action Committee) करण्यात आलेल्या आंदोलनाला बुधवारी अखेर विद्यापीठ प्रशासनामार्फत प्र-कुलगुरू संजीव सोनवणे (Vice Chancellor Sanjeev Sonawane) आणि कुलसचिव प्रफुल पवार (Registrar Praful Pawar) यांनी भेट देऊन समितीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुल्कवाढीबाबत समितीशी चर्चा करून लवकरच शुल्कवाढ मागे घेऊ, असे लेखी अश्वासनात म्हटले आहे. त्याचबरोबर अनिकेत कँटीन, झेरॉक्स सेंटर आणि इंटरनेट कॅफेचेही टेंडर काढत असून आगामी दहा दिवसांमध्ये ते देखील सुरू करू असं सांगण्यात आले. (Pune SPPU)

 

विद्यापीठातील विद्यार्थीहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन सातत्याने विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसोबत प्रत्येक महिन्यात सातत्याने चर्चा करेल आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवर्जून काम करेल, असे देखील प्रशासनाने सांगितले. दरम्यान, विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फी वाढीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, समितीकडून अजुन कोणताही समाधानकारक निर्णय झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.

 

काय होत्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ?

पदव्युत्तर आणि पीएच. डी (Ph.D) अभ्यासक्रमांची फी वाढ रद्द करावी.
वसतिगृहांची फी वाढ रद्द करणे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्रांचे शुल्क विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे.
विद्यार्थी संशोधकांसाठी वसतिगृह लवकरात लवकर सुरू करणे.
पीएच. डी. साठी फेलोशिप पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थी संशोधक. अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्या ठिकाणी त्वरित सुरू करण्यात यावे.

 

Web Title :- Pune SPPU | pune university student protest against fee hike stopped sppu news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा