Pune : डेक्कन येथील सेंट्रल मॉलच्या पार्किंग मध्ये केमिकल सदृश्य वायूचा प्रसार; 300 ते 350 नागरिकांना भयंकर त्रास
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कर्वे रस्त्यावर असणाऱ्या सेंट्रल मॉलच्या पार्किंग मध्ये केमिकल सदृश्य वायूचा प्रसार होऊन तीनशे ते साडे तीनशे नागरिकांना भयंकर त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, मॉल प्रशासनाला देखील नेमका हा प्रकार माहिती नसल्याचे समोर आले आहे. आता पोलीस व एनसीएल या वायूचा तपास करत आहे. पार्किंगमधून हा वायू बाहेर आला असल्याचे अग्निशमनकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना नागरिकांना धुरामुळे त्रास होत असल्याची माहिती मिळाली. यावेळी एरंडवना अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. यावेळी अनेकजणांना नागरिकांना मॉलच्या बाहेर काढण्यात येत होते. पण, गोंधळ वाढला होता. यामुळे कोथरुड फायर ब्रिगेड देखील दाखल झाले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील या केमिकल सदृश्य वायूचा त्रास सुरू झाला होता. ही माहिती पोलिसांना देखील देण्यात आली होती. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डेक्कन पोलीस व अग्निशमनच्या जवानांनी मॉलमध्ये असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी तीनशे ते साडे तीनशे नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.
Maharashtra: A minor chemical leak reported in Central Mall parking near Garware College in Pune today. 2 fire tenders were rushed to spot & mall was evacuated. A bag containing 2 chemicals was found. The situation was later brought under control & mall was reopened. Probe is on. pic.twitter.com/EFY8Q1alDj
— ANI (@ANI) March 29, 2021
नागरिकांना वायूमुळे डोळे, कान, नाक घशात जळजळ होण्याचा भयकर त्रास झाला. अचानक नागरिकांना त्रास होत असल्यानेच हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सर्वांना माहिती देण्यात आली. दरम्यान अग्निशमन व पोलिसांनी हा वायू नेमका आला कोठून याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो पार्किंगमधून येत असल्याचे समोर आले. तर त्याठिकाणी पांढरी पावडर आणि बॉटलमध्ये हा एकत्र होऊन त्याचा वायू झाला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर अग्निशमन दलाने याबाबत सुरक्षा रक्षक यांच्याकडे हे का ठेवले चौकशी केली. त्यावेळी या सुरक्षा रक्षकांना देखील हे कोणी ठेवले हे माहिती नव्हते. त्यांनी आम्ही असे काही ठेवले नसल्याचे सांगितले. तोपर्यंत अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून तो वायू कमी केला होता. पण त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास झाला असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही पडताळणी करून आता पार्किंगमध्ये या बॉटल कोणी आणून ठेवल्या याचा तपास केला जाणार आहे. तर पोलीस आणि एनसीएल देखील नेमका हा काय प्रकार आहे याची माहिती घेणार आहे.
मॉल पार्कींग खाली. त्यातही स्टाफ पार्किंग स्वतंत्र आहे. त्याठिकानाहून हा केमिकल बाहेर आला आहे. त्यातही अंदाज असा आहे की ऍसिड असावे. धुण्यासाठी वापर होतो. त्यावर पाणी पडून त्याचा वास झाला असावा. दरम्यान मॉल प्रशासनाची जबाबदारी आहे. मॅनेजर व सुरक्षा याना बोलवून माहिती घेतली जात असल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक करपे यांनी सांगितले.