Pune ST Bus Accident | पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटी बसचा भीषण अपघात, 7 ते 8 गाड्यांना उडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर (Shankar Maharaj Flyover) आज एसटीचा भीषण अपघात (Pune ST Bus Accident) झाला. एसटीचा ब्रेक फेल (Break Fail) झाल्याने तीन ते चार दुचाकीस्वारांना एसटीने उडवले. तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्याचे पहायला मिळत आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी (Loss of Life) झाली नसली तरी अनेकजण जखमी (Injured) झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. (Pune Crime)

 

एसटीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने बसवरील नियंत्रण सुटल्याने शंकर महाराज उड्डाणपुलावर हा अपघात (Pune ST Bus Accident) झाला. यामध्ये एसटी बसने अनेक वाहनांना उडवले. अपघातात बसखाली काही दुचाकी (Two-wheeler) देखील आल्या असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Pune Police) तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

 

एसटी बसच्या भीषण अपघातात जीवितहानी झाली नसली तरी अनेकजण जखमी झाले आहेत.
या सर्व जखमींना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune ST Bus Accident | A horrific ST bus crashed on the Shankar Maharaj flyover in Pune blowing up 7 to 8 trains

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा