टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, ड्रायव्हर- कंडक्टर ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई- बेंगळूर महामार्गावर पाषाण जवळ झालेल्या अपघातात एसटी ड्रायव्हरआणि कंडक्टरचा मृत्यू झाला असून पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर राजीव सुंदरम गांधी (वय 36, रा. उलुंडरपेट, जि. विल्लपुरम, तामिळनाडू) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून भोरला जाणाऱ्या एसटीचा टायर पंक्चर झाल्यामुळे ड्रायव्हर मोहन उत्तमराव बांदल आणि कंडक्टर शंकर चंद्रकांत चव्हाण यांनी एसटी रस्त्याच्या बाजूला थांबवली होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. या अपघातात बांदल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर चव्हाण यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच पाच प्रवासीही जखमी झाले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी