Pune ST Workers Strike | पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडीत ST कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune ST workers strike | महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers) संप सुरू आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याही घडत आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कामगारांनी 2 दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. यामुळे पुण्यातील शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील एसटी स्थानक ठिकाणी एसटी कामगार अर्धनग्न आंदोलनास (Pune ST workers strike) बसले आहेत. यावेळी ते राज्य शासनाविरोधात (State Government) जोरदार आंदोलने करीत आहेत.

त्यावेळी आंदोलनकर्ते (Pune ST workers strike) जोरदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. ज्या राज्यकर्त्यांनी सत्ता भोगली किंवा विरोधी बाकावर राहिले, त्यांनी आजवर तुमचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन मागे घेतले, कारण आमचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा होती. पण, आता आम्ही मागे हटणार नसून राज्य सरकारने (State Government) लवकरात लवकर एस.टी कामगार शासनामध्ये विलिनीकरणाचा आदेश काढावा, नाहीतर अधिक तीव्र लढा उभारला जाईल. तुमच्यामुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आलीय. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, आजवर आम्ही कोणताही सण कुटुंबासोबत साजरा केला नाही. एवढ तरी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. अशी प्रतिक्रिया देण्यात आलीय.

दरम्यान, एसटी कामगारांचा (ST worker) संप अधिकच चिघळला असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. एसटीने प्रवास करणारे अनेक प्रवासी हे आहे त्या ठिकाणी जावू शकले नाही. त्यामुळे काही प्रवाशांना (traveller) जादा पैसे देऊन खासगी वाहनांचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी देखील वैतागले आहेत. त्यांच्यामधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. तसेच, एका बाजूला महागाईमुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यात एस.टी कामगारांच्या संपामुळे आम्हाला किमान 3 पट दर देऊन प्रवास करावे लागत आहे. यामुळे राज्य सरकारने एस.टी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Web Title : Pune ST Workers Strike | Half naked agitation of ST workers at Wakdewadi in Shivajinagar, Pune (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या Multibagger Stock ने दिला 1100 टक्केपेक्षा जास्त नफा, 10 हजाराचे झाले 1.11 कोटी रुपये; जाणून घ्या

Faraz Malik | फडणवीसांच्या आरोपांवरून नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले…

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेमचेंजर्स’ संघाचे सलग दोन विजय !