पुण्यात महिलेला धाक दाखवून ‘घर’ लुटण्याचा प्रयत्न, महिलेने चोरालाच लावले पळवून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात हिंजवडी भागात आज एक थरारक प्रकार घडला. घरात घुसणाऱ्या चोरट्याने महिलेला तीन वेळा धारदार शस्त्राने भोकसून देखील महिलेने ध्यैर्याने तोंड देत या चोरालाच पळवून लागवले. हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यात चोराने रुमालाने चेहरा झाकलेला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार हा प्रकार साखरे वस्तीतील एका इमारतीत पाचव्या मजल्यावर घडला. सीमा हुलावले या मंगळवारी दुपारी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. तर पती आपल्या दोन मुलांसह कामानिमित्त बाणेरला गेले होते. पावणे ५ च्या सुमारास चोर घरात शिरला. सीमा हुलावले या झोपल्या होत्या. त्यांना चोराने उठवले आणि आरडा ओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांच्या हातावर चाकूने वार केला.

चोरट्याने काढला पळ

नंतर देखील या चोरट्याने त्यांच्यावर वार केले. जखमी केल्यानंतर देखील त्यांनी चोरट्याचा प्रतिकार केला. त्यांनी प्रतिकार करत चोरट्याला जोरात लाथ मारली, त्यामुळे तो चोर खाली पडला. त्यानंतर रागाने चोरट्याने त्याच्या मानेवर चाकू हल्ला केला. पण त्यांनी न घाबरता चोरट्याचा प्रतिकार केला. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवून खिडकी उघडली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर चोरट्याने त्यांना बेडरुममध्ये बंद करुन घरातून पळ काढला.

रुग्णालयात उपचार सुरु

हुलावलेंची पुतणी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. हुलावले आरडाओरडा करत असल्याचे लक्षात आल्याने त्या पहिल्या मजल्यावर गेल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला. यानंतर इमारतीतील इतरांना याबाबत महिती मिळाली. त्यांनी हे त्यांच्या पतीला कळवले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली.

चोरटा मराठी भाषेत बोलत होता. त्याने पांढरा शर्ट आणि निळी पँट घातली होती. रुमालाने चोरट्याने तोंड झाकले होते. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. अशी माहिती हुलावले यांचे पती रंगनाथ हुलावले यांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त